माधूरीकडून निवडणूक लढण्याच्या चर्चेला पूर्णविराम, बघा काय म्हणाली...

Foto

पुणे- बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित भाजपच्या तिकिटावर पुण्यातून लोकसभा निवडणूक लढणार का? अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होती. मात्र या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. हे वृत्त चुकीचे असल्याचा दावा माधुरीच्या प्रवक्त्यांनी केला आहे.

 

काही महिन्यांपूर्वी भाजपच्या संपर्क अभियानासाठी मुंबई दौर्‍यावर आलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अभिनेत्री माधुरी दीक्षितची तिच्या घऱी जाऊन भेट घेतली होती. त्यावेळी माधुरीला राज्यसभेची ऑफर देण्यात आल्याची चर्चा रंगली होती. आता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातून भाजपतर्फे माधुरी दीक्षित यांना उमेदवार असणार, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, या वृत्तात तथ्य नाही, असे माधुरीच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे.